बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 426 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं (Coronavirus)4 हजार 446 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 258 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 68 हजार 30 वर पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 58 हजार 312 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यातील कोरोनाच्या अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 5 हजार 272 एवढी आहे. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 409 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 247 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.