पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे विभागातील 4 लाख 89 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 18 हजार 757 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 7 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 31 हजार 777 रुग्णांपैकी 3 लाख 14 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 242 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.78 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 892 रुग्णांपैकी 44 हजार 743 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 506 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 238 रुग्णांपैकी 39 हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 255 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 121 रुग्णांपैकी 44 हजार 42 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 397 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 729 रुग्णांपैकी 46 हजार 455 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 607 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 667 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 523 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 359 , सातारा जिल्ह्यात 42, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 28 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 636 रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 375, सातारा जिल्ह्यामध्ये 57, सोलापूर जिल्ह्यामध्ये 126, सांगली जिल्ह्यामध्ये 64 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 98 हजार 703 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 18 हजार 757 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )