बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना संकट काळात पोलीस गेल्या अनेक महिन्यापासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र कर्तव्य पार पाडत आहेत. पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्ध्यांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 311 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 19 हजार 385 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरु असलेले (अॅक्टिव्ह) 3 हजार 670 जण आहेत. तर आतापर्यंत 15 हजार 521 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 194 वर पोहचला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील 19 हजार 385 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2 हजार 131 अधिकारी व 17 हजार 254 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या 3 हजार 670 पोलिसांमध्ये 478 अधिकारी व 3 हजार 192 कर्मचारी आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 15 हजार 521 पोलिसांमध्ये अधिकारी 1 हजार 635 व 13 हजार 886 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मत्यू झालेल्या 194 पोलिसांमध्ये 18 अधिकारी आणि 176 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
311 police personnel of Maharashtra Police tested positive for #COVID19 & 5 died in the last 24 hours, taking the total number of infections in the force to 19,385 including 3,670 active cases, 15,521 recovered cases and 194 deaths: Maharasthra Police pic.twitter.com/6N0d61NeOR
— ANI (@ANI) September 14, 2020