बहुजननामा ऑनलाईन
पुणे :- पुणे विभागातील 3 लाख 99 हजार 81 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 67 हजार 857 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 56 हजार 199 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 3 हजार 349 रुग्णांपैकी 2 लाख 63 हजार 652 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 32 हजार 734 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 963 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.91 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 981 रुग्णांपैकी 32 हजार 752 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 897 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 334 रुग्णांपैकी 29 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 535आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 644 रुग्णांपैकी 34 हजार 313 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 831 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 549 रुग्णांपैकी 38 हजार 812 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 83 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 957, सातारा जिल्ह्यात 345, सोलापूर जिल्ह्यात 295, सांगली जिल्ह्यात 314 तर कोल्हापूर जिल्ह्यात 172 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 958 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 87, सातारा जिल्हयामध्ये 557,सोलापूर जिल्हयामध्ये 495, सांगली जिल्हयामध्ये 529 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 290 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 86 हजार 138 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 67 हजार 857 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )