पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 137 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत तब्बल 4 हजार 380 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. दिवसभरात 221 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातनू डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 879 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 56 हजार 361 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 4 हजार 129 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टिव्ह रूग्णांपैकी 377 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 245 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावे असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे.