बहुजननामा ऑनलाईन
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 19932 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे 11 हजार 921 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 180 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 11,921 new #COVID19 cases, 180 deaths and 19,932 discharges today. Total cases in the state rise to 13,51,153, including 35,751 deaths and 10,49,947 discharges. Active cases stand at 2,65,033: Public Health Departent, Maharashtra pic.twitter.com/KZXOsm9FE2
— ANI (@ANI) September 28, 2020
सध्या राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 13 लाख 51 हजार 153 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 10 लाख 49 हजार 947 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 2 लाख 65 हजार 033 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. कोरोनामुळं राज्यात आतापर्यंत 35 हजार 751 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 77.71 टक्के इतका आहे. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे.