नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना(Corona) व्हायरस (कोविड-19) चा सर्वसामान्यांच्या जीवनांवर खुप खोलवर परिणाम झाला आहे. हा जीवनासाठी(Corona) धोकादायक ठरत असतानाच सामान्य लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणामकारक ठरत आहे. एका मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या अभ्यासात समजले आहे की, या धोकादायक व्हायरसच्या चिंतेने अनेक मातांना निद्रानाश आणि एंग्जायटीची समस्या होत आहे.
इस्त्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीचे संशोधक लिएट टिकोत्जकी यांनी म्हटले, कोरोना महामारीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. मातांमध्ये एंग्जायटी आणि निद्रानाशसोबतच मुलांमध्ये सुद्धा समस्या दिसून येत आहेत. स्लीप जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, मातांमध्ये महामारीदरम्यान निद्रानाशाची समस्या वाढून दुप्पट म्हणजे 23 टक्के झाली आहे. कोरोना महामारीपूर्वी ही समस्या अवघी 11 टक्के होती. सुमारे 80 टक्के मातांनी मध्यमपासून उच्च स्तराच्या एंग्जायटीची तकार सुद्धा केली.
अभ्यासात सहभागी सर्व इस्त्रायली महिलांना कोरोना महामारीपूर्वीच्या त्यांच्या मानसिक स्थितीविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना लॉकडाऊनमध्ये घरात राहात असतानाच्या मानसिक स्थितीविषयी सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. यानंतर दोन्ही स्थितींची तुलना करण्यात आली. मात्र, बहुसंख्यांक महिलांनी आपल्या मुलांच्या झोपेसंबंधी कोणत्याही समस्येची तक्रार केली नाही. मात्र, सुमारे 30 टक्के मातांनी आपल्या मुलांची झोप कमी झाल्याचे सांगितले.