नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोना व्हायरस सोबत लढा देत असताना राजस्थान मधील बुंदी मध्ये शेकडो लोक एकाच ठिकणी जमा झाले. लॉकडाऊन आणि राजस्थान सरकारने कलम १44 लागू करूनही मोठ्या संख्येने लोक जमले.
दरवर्षीप्रमाणे या वेळीही नवरात्रोत्सवात आयोजित कार्यक्रमात लोक सहभागी झाले होते, यावेळी लॉकडाऊन होता आणि लोक एकाच ठिकाणी एकत्र येण्यास बंदी आहे. शुक्रवारी अंधश्रद्धेचा खेळ पाहण्यासाठी शेकडो लोक जमा झाले होते. राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील रामनगर आणि लाकेरी शहरांमध्ये खेळाच्या संदर्भात बुंदीच्या सदर पोलिस स्टेशनने आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे.
केवळ छतावरच नाही तर रस्त्यावरही प्रचंड गर्दी दिसून आली
हा खेळ गल्लो-गल्ली चालू होता लोकांनी केवळ छतावरच नाही तर रस्त्यांवर देखील गर्दी केली होती. वेगवेगळ्या कसरती रस्त्यावर करून दाखवल्या जात होत्या. लॉक डाऊन जाहीर केलेले असताना सुद्धा इथे खूप लोक जमा झाले होते.
बुंदी जिल्ह्यातील रामनगर येथे झेंडा उतरवण्याच्या दरम्यान लोक जमा झाले. बुंदी येथील लाखेरी भागात माताजी मंदिरात हे दृश्य पाहण्यात आले. जिथे एका पुजाऱ्याच्या भोवती मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीस त्या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी सर्वांना हटकले आणि प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्याच्या सूचना केल्या. पोलिसांना गर्दीला समजून सांगण्यास खूप विनवण्या कराव्या लागलया. मंदिराच्या पुजाऱ्यालाही खूप समजवावे लागले ज्याच्यामुळे गर्दी जमा झाली होती.
लोक दरवर्षी खेळ पहायला येतात
रामनगर येथील प्रकरण थोडे वेगेळे होते. जिथे १०० पेक्षा जास्त लोक छत आणि रस्त्यांवर उतरले होते. काहीजण अर्धनग्न होऊन तलवार घेऊन इथे खेळ दाखवत होते. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
रामनगर मध्ये नवमीच्या संध्याकाळी आणि दशमी दिवशी खेळ मोठ्या प्रमाणावर पहायला मिळाला. लोकांनी येथे कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता दरवर्षीप्रमाणे खेळ बघण्यासाठी गर्दी केली होती.ही माहिती मिळताच सदर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचल्याने प्रकरण शांत झाले आणि लोकांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. सदर पोलिस ठाण्याने या संपूर्ण प्रकरणात खेळ बनविणार्या मुख्य 5 आरोपींना अटक केली आहे.