नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. जगभरातील अनेक देश कोरोनावर लस आणि औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही कंपन्यांनी तयार केलेल्या लसीची मानवी चाचणी यशस्वी झाली, असा दावा कंपन्यांनी केला आहे. दरम्यान कोरोनाच्या मध्यम आणि गंभीर रुग्णावर उपचार करण्यासाठी बायोकॉन नावाची कंपनी एक औषध घेऊन येत आहे. या बायोलॉजिक औषधाचे नाव इटोलिझुमाब असे आहे. याची किंमत साधारणपणे 8 हजार रुपये प्रति बाटली एवढे असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीने सांगितले की, कोरोनामुळे मध्यम किंवा गंभीर अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (SRDS) प्रकरणात, सायटोकाइन रिलीस सिंड्रोमच्या उपचारासाठी भारतात आणीबाणीजन्य परिस्थितीत वापरासाठी, इटोलिझुमाब इंजेक्शनच्या (25 मिग्रा/पाच मिली लीटर) विक्रीला भारतीय औषध महानियंत्रक कडून मंजुरी मिळाली आहे. बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते की, इटोलिझुमाब जगात स्विकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे.त्याच्या सहाय्याने कोविड-19 च्या गंभीर रुग्णांवर उपचार केला जातो.
बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ म्हणाले, जोवर व्हॅक्सीन उपलब्ध होत नाही, तोवर आपल्याला अशा जीव वाचविणाऱ्या औषधांची आवश्यकता असते. हे औषध या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला मिळो. मात्र या औषधामुळे कोरोनाचे संक्रमण होणार नाही याची शाश्वती देता येत नाही. पण ज्या पद्धतीने ही लस काम करेल, त्यानुसार अशा करत आहोत. ती त्याच पद्धतीने काम करेल याचीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे.