नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता या व्हायरसबाबत नवी माहिती समोर आली आहे. हा कोरोना व्हायरस पाण्यात आढळला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (WHO) अभ्यासात आता नवी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस पाण्यात आढळला आहे. तीन ठिकाणांवरून घेतलेल्या सँपलमधील एक सँपल पॉझिटिव्ह मिळाले आहे. आता पाण्यात आढळलेला व्हायरस मानवावर किती परिणाम करतो याचा अभ्यास सध्या सुरु करण्यात आला आहे. SGPGI च्या मायक्रोबायोलॉजी विभागाकडून याचा अभ्यास केला जात आहे.
खदरा येथील सँपलमध्ये कोरोना व्हायरस
SGPGI च्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे HOD प्रोफेसर उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले की, ICMR-WHO च्या माध्यमातून देशभरात सिव्हेज सँपलिंग सुरु करण्यात आले आहे. लखनौमध्ये खदराच्या रुकपूर, घंटाघर व मछली मोहालच्या ड्रेनेजपासून सिव्हेज सँपल घेण्यात आले आहे. 19 मेला या सँपलची तपासणी केली गेली तर रुकपूर खदराच्या सिव्हेज सँपलमध्ये कोरोना व्हायरस मिळाला आहे. मुंबईच्या सिव्हेजच्या सँपलमध्येही व्हायरस मिळाल्याची माहिती मिळाली.
मलच्या माध्यमातून पाण्यात पोहोचू शकतो व्हायरस
डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले की, काही कालावधीपूर्वी PGI रुग्णांचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये मलमधील व्हायरस पाण्यात पोहोचू शकतो. तसेच अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे, की कोरोना व्हायरस पीडित रुग्णांच्या स्टूल (मल) पासून सिव्हेजपर्यंत पोहोचू शकतो.
पाण्यात संसर्ग झाल्यानंतर…
सिव्हेजच्या माध्यमातून नदीपर्यंत पाणी पोहोचते. यामध्ये हे लोकांवर किती परिणामकारक असेल त्याचा अभ्यास करणे बाकी आहे. यावर अभ्यास केल्यानंतर पाण्यात संसर्ग होण्याबाबतची माहिती स्पष्ट होईल, याबाबत काहीही सांगता येणार नाही. मृतदेहाच्या माध्यमातून संसर्ग पसरण्याबाबत कोणताही अभ्यास केला गेला नाही, असे सांगण्यात आले आहे.