मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत असून अधिकारीक आकड्यांनुसार देशात आतापर्यंत या व्हायरसचे १२५ प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनापासून महाराष्ट्र राज्य जास्त प्रभावित झाले असून कमीत कमी ३९ लोकांना लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने कंबर कसली असून बीएमसीने एक एडव्हायजरी सादर करत लोकांना विनाकारण घरातून न निघण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे.
एडव्हायजरीमध्ये खाजगी कंपन्यांना आपल्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा देण्याचा आदेश दिला गेला आहे. बीएमसीने म्हटले आहे कि भारत सरकारने ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सरकारने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केले आहे. त्याच्याशी जोडलेल्या आदेशांचे पालन ना करणाऱ्यांना कलम १८९७ अंतर्गत ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असेही बीएमसीने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी अगोदरच ‘ग्रुप टूर’वर बंदी आणली असून कलम ही बंदी १४४ अंतर्गत लावली गेली आहे.
नागपूरमध्ये कलम १४४ लागू!
दुसरीकडे अनावश्यक गर्दी जमवल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम १४४ अन्वये कारवाई केली जाऊ शकते, अशी नोटीस नागपूर पोलिसांकडून जारी केली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, देशात आणि जगात कोरोना विषाणूचा प्रसार होत असून हा एक संसर्गजन्य आजार आहे. हे रोखण्यासाठी सरकारने नागपुरात कलम १८९७ लागू केली आहे. अशा परिस्थितीत जर एखादा मेळावा लोकांना एकत्र करण्यासारखे काम करत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
नोएडा पोलिसांनी जारी केला संदेश
नोएडा पोलिसांनीही एक अतिशय उपयुक्त संदेश दिला आहे. नोएडा पोलिसांच्या व्हायरल संदेशानुसार, “जर काही लोक एखाद्याच्या घराच्या दाराजवळ किंवा कॉलनीच्या गेटवर एखाद्या समूहामध्ये आले आणि त्यांनी स्वत:ला सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी म्हटले तर काळजी घ्या. काही लोक येऊन असेही म्हणू शकतात की, ते एंटी-कोरोना फवारणीसाठी किंवा सरकारच्या वतीने औषधांचे वितरण करण्यासाठी आले आहेत. परंतु या लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका.”
कृपया दिए गए मैसेज को ध्यान से पढ़ें।
किसी भी अनजान व्यक्ति को अपने घर मे प्रवेश न करने दें, वह 'हेल्थ वर्कर' के वेश में अपराधी हो सकता है।
सतर्क रहें, सावधानी बरतें। @Uppolice @dgpup @CP_Noida @dmgbnagar pic.twitter.com/TCF4PR2uJr
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) March 16, 2020
व्हायरल झालेल्या संदेशानुसार , “शक्य आहे कि अशावेळी काही असामाजिक तत्व आपल्या-तुमच्या समस्येचा बेकायदेशीर फायदा घेत गुन्हेगारी घटनांना रस्ता देऊ नका.”