नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑक्सफोर्डचा कोरोनावरील मानवी चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता अंतिम टप्प्यातील निरीक्षण सुरू आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने 2021 आधी कोरोनाचे वॅक्सीन येण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे म्हटले आहे. 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात वॅक्सीन येईल असा दावा जागतिक संघटनेने केला आहे.
Don't expect first COVID-19 vaccinations until early 2021 – WHO's Ryan https://t.co/xYRC9itGkR pic.twitter.com/PuhHVxCRzD
— Reuters (@Reuters) July 22, 2020
जगभरात रशिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील काही संस्थाही कोरोनाच्या वॅक्सीनवर वेगवेगळ्या टप्प्यात काम करत आहे. कोरोनावर वॅक्सीन तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला यश मिळाले आहे. . 2021 ला कोरोनाचे वॅक्सीन उपलब्ध झाले तरी मोठ्या प्रमाणात ते तयार करणे आणि पोहोचवण्यासाठी वेळ लागू शकतो असेही संघटनेने नमूद केले आहे. कार्यकारी संचालक माइक रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे वॅक्सीन संशोधकांना यश मिळवून देत आहे. पण 2021 आधी ही वॅक्सीन उपलब्ध होऊ शकत नाही. 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात हे वॅक्सीन तयार झाले तरीही ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात वेळ लागू शकतो. वॅक्सीन तयार होण्याचा वेग थोडा कमी झाला असला तरीही त्याच्या सुरक्षा मानकामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये याकडेही लक्ष आहे.