हवाना :वृत्तसंस्था – Corona Vaccine | जगभरात सध्या मुलांच्या व्हॅक्सीन (Corona Vaccine) देण्यावर संशोधन किंवा चाचणी सुरू आहेत. तर दुसरीकडे असा सुद्धा एक देश आहे जिथे 2 वर्षाच्या मुलांना सुद्धा कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन देण्यास सुरूवात झाली आहे. या देशाचे नाव क्यूबा (Cuba) आहे. या छोट्या देशाने अगोदर 12 वर्षावरील मुलांना कोरोना व्हॅक्सीन देण्यास सुरूवात केली होती. यानंतर 2 वर्षाच्या मुलांना व्हॅक्सीन दिली जात आहे. असे करणारा हा पहिला देश ठरला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार क्यूबामध्ये सध्या लोकांना दोन कोरोना व्हॅक्सीन दिल्या जात आहेत.
यामध्ये अब्दला आणि सोबराना व्हॅक्सीनचा समावेश आहे.
मुलांवर या व्हॅक्सीनची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे.
मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेकडून यास मान्यता दिलेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
क्युबामध्ये 3 सप्टेंबरला 12 वर्षापासून जास्त वयाच्या मुलांना कोरोना व्हायरस व्हॅक्सीन देण्यास सुरूवात केली होती. यानंतर सोमवारीपासून देशात 2 ते 11 वर्षाच्या मुलांना लस देणे सुरू केले आहे. या वयोगटाच्या मुलांना क्यूबाच्या सिएनफ्यूगोस शहरातच व्हॅक्सीन देण्यात येत आहे.
चीन, संयक्त अरब अमीरात आणि व्हेनेजुएला सारख्या देशांनी छोट्या मुलांना व्हॅक्सीन देण्याची घोषणा केली आहे. परंतु आता सुरुवात झालेली नाही.
तर भारतात 12 वर्षावरील मुलांना कोरोना व्हॅक्सीन देण्याची तयारी सुरू आहे.
यासाठी जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनला आपत्कालीन मंजूरी दिली आहे.
Web Title : Corona Vaccine | international studies light exercise during pregnancy can prevent baby at risk of asthma claims new research.
OMG ! एकाच मुलासोबत लग्न करण्यासाठी आडून बसल्या दोन मुली, मग टॉस उडवून निवडली वधू!