डॉक्टरांनी विचारलेल्या “या” ७ प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार
१. तुम्हाला कोणतं औषध, पदार्थ, लसीची किंवा कोविशिल्डमध्ये वापरलेल्या घटकांची अॅलर्जी आहे का?
२. तुम्हाला ताप आहे का?
३. तुम्हाला रक्तासंबंधी कोणता आजार किंवा समस्या तर नाही ना? किंवा तुम्ही रक्त पातळ होण्याचं औषधं घेत आहात का?
४. रोगप्रतिकारक प्रणालीवर प्रभाव टाकत असतील अशी कोणती औषधं तुम्ही घेता का?
५. तुम्ही गरोदर आहात का?
६. तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करता का?
७. याआधी तुम्ही कोणती कोरोना लस घेतली आहे का?
‘सीरम’मध्ये उत्पादीत झालेली कोविशिल्ड लस मंगळवारपासून (दि. 12) पहिल्यांदाच देशभर पाठवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुनावाला माध्यमांशी बोलत होते. येत्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांत 200 रुपये प्रती डोस याच दराने तब्बल १० कोटी डोस पुरवण्याचे आश्वासन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहं, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. युरोप, अमेरिका, रशिया, चीन आदी जगातील कुठल्याही देशांमध्ये एवढ्या कमी किमतीत ही लस उपलब्ध करून दिली जात नाही, असा दावाही पुनावाला यांनी केला आहे.
पहिल्यांदा स्वदेश, नंतर परदेश…
गेले आठ-नऊ महिने संशोधन, चाचण्या, विविध परवानग्या, उत्पादन अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप आव्हानात्मक होते. मात्र या सर्व वाटचालीत आमच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगदान देत आज अखेरीस लस सर्वसामान्य देशवासियांपर्यंत पोहोचवली. आमच्यासाठी हा भावनात्मक क्षण आहे. दर महिन्याला पाच ते सहा कोटी कोविशिल्ड डोस तयार करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. पहिल्यांदा देशात पुरेसा पुरवठा झाल्यानंतर इतर देशांना पुरवठा करण्यासंदर्भात विचार केला जाईल. असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे
सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले