बहुजननामा ऑनलाइन टीम – – कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकून अनेकांचा बळी गेला आहे. भारतामध्ये देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत असताना त्यांच्या संपर्कात आल्याने अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाला आहे. देशात 22 जानेवारी पर्यंत 162 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
162 doctors, 107 nurses & 44 ASHA workers died due to COVID-19 in the country till Jan 22: Union Health Minister in a written reply in Parliament
— ANI (@ANI) February 2, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले की, 22 जनेवारीपर्यंत देशात कोरोनामुळे 162 डॉक्टर, 107 नर्स आणि 44 आशा वर्कर यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात 13 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 1 कोटी 4 लाख 48 हजार 406 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मागील 24 तासात देशात 94 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 1 लाख 54 हजार 486 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 1 लाख 63 हजार 353 अॅक्टिव्हि रुग्ण आहेत.