बहुजननामा ऑनलाइन – लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद शहरातील खडकेश्वर भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये ओली पार्टी केली. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना हॉटेलमध्ये जेवणात बंदी आहे, दारू पिण्यास बंदी अजून बंधन आहेत. मात्र कायद्याला धाब्यावर बसून पार्टीत झिंगाट गाण्यावर झिंग उतरेपर्यंत पोलीस नाचलेले पाहायला मिळाले.
पोलीस अधिकार्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निवृत्त झालेले काही अधिकारी आणि सध्या सेवेत असलेले काही अधिकारी पार्टीला हजर होते. या पार्टीसाठी हॉटेलमध्ये एका हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. पार्टी रंगात आल्यावर झिंगाट गाण्यावर अधिकार्यांनी ताल धरला. या पार्टीत सहभागी होते औरंगाबाद क्राइम ब्रान्च एपीआय अनिल गायकवाड शहर वाहतूक शाखेचे श्रीकांत नवले यासह अन्य काही अधिकारी उपस्थित होते. या व्हिडीओमध्ये गायकवाड नवले यांच्यासह एक-दोन वर्षापूर्वी रिटायर एक दोन वर्षापुर्वी रिटायर झालेले अधिकारी झिंगाट गाण्यावर बेधुंद होऊन नाचत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.