बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरस महामारीच्या दुसर्या लाटेत मुलांमध्ये संसर्गाचा धोका जास्त दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये नवजात बाळांपासून 10 वर्षांपेक्षा छोट्या बाळांना सुद्धा संसर्ग होत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तरप्रदेशसह राजधानी दिल्लीत मुलांमध्ये कोरोना संसर्ग आढळत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचे हे आकडे पालकांची चिंता वाढवत आहेत. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग दररोज वाढत चालला आहे.
– महाराष्ट्रात 0-5 वर्षाची सुमारे 9,900 आणि 6 ते 10 वर्षांची 15 हज़ार मुले संक्रमित
– छत्तीसगढमध्ये 0-5 वर्षांची 900 आणि 6 ते 10 वर्षांची 1400
– कर्नाटकमध्ये 0-5 वर्षांची 900 आणि 6 ते 10 वर्षांची 1200
– दिल्लीत 0-5 वर्षांची 450 आणि 6 ते 10 वर्षांची 700
– उत्तर प्रदेशात 0-5 वर्षांची सुमारे 500 आणि 6 ते 10 वर्षांची सुमारे 700 मुले संक्रमित झाली.
मात्र, 11 ते 17 वर्षाच्या वयाच्या मुलांमध्ये संसर्गाचा वेग सर्वात जास्त आढळला आहे. 1 मार्चपासून 4 एप्रिलच्या दरम्यान या वयोगटात कोरोना संसर्गाचे आकडे चिंतेत टाकणारे आहेत. छत्तीसगढमध्ये 3644, दिल्लीत 1630, कर्नाटकमध्ये 5280, युपीमध्ये 1862 आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त 11 ते 17 वर्ष वयादरम्यानची 36142 मुले कोरोना संक्रमित आढळली. तज्ज्ञांनुसार, मुलांमध्ये पसरत असलेल्या कोरोनाच्या मागे नवीन व्हेरियंटची उपस्थिती सर्वात मोठे कारण आहे.
आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितले की, दुसर्या लाटेत वेगवेगळ्या लाटेचे म्यूटेशन आहे. त्यापैकी एक सर्वात जास्त पंजाबमधून आहे तिथे युकेचा व्हेरियंट आहे. हा व्हायरस मुलांमध्ये जास्त पसरत आहे. आम्हाला 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सुद्धा दिसत आहे, परंतु व्हायरस पहिल्यासारखा मुलांमध्ये सिरियस नाही. मोर्टालिटी, न्यूमोनिया नाही. पुढे जाऊन काय होईल हे सध्या सांगता येत नाही. पाच वर्षावरील मुलांना मास्क घालून त्यांना वाचवणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण खुपच कमी होते.