नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढ होत असून १४१ पॉजिटीव्ह प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाने संक्रमितांची संख्या वाढत असताना लोकांना खबरदारी राखणे सुरू केले आहे. मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आणि भाजपचे खासदार सुरेश प्रभू यांनी स्वतःला आयजोलेटेड केले आहे. याअगोदर केंद्रीय संसदेचे कार्य राज्य मंत्री वी. मुरलीधरन यांनी स्वतःला होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
खरंतर भाजपचे खासदार सुरेश प्रभू १० मार्चला सौदी अरेबियाला गेले होते. यानंतर ते जेव्हा भारतात परतले तेव्हा कोरोनाची चाचणी केली होती. चाचणी निगेटिव्ह आली, पण खबरदारी घेत सुरेश प्रभू यांनी १४ दिवस स्वतःला आयजोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ते आपल्या घरात होम क्वारंटाइन असून यादरम्यान ते कोणालाही भेटलेले नाहीत आणि कोणी त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही. एक मेडिकल टीम विनाकारण त्यांच्या घरी तैनात केली आहे.
BJP MP Suresh Prabhu has kept himself under isolation at his residence for the next 14 days, as a precautionary measure even after testing negative, following his return from a recent visit to Saudi Arabia to attend Second Sherpas' Meeting on 10th March 2020. (file pic) #COVID19 pic.twitter.com/jz4YYX6ecf
— ANI (@ANI) March 18, 2020
होम क्वारंटाइनमध्ये वी. मुरलीधरन
याअगोदर मोदी सरकारमधील संसदीय कार्य राज्यमंत्री वी. मुरलीधरन कोरोना व्हायरस वाढत असल्यामुळे त्यांनी स्वतःलाच क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या स्टाफने मंगळवारी याबाबत माहिती देत सांगितले की, मंत्रीजी केरळमध्ये एका परिषदेत गेले होते, जिथे ते कोविड-१९ ने संक्रमित एका डॉक्टरांच्या संपर्कात आले होते.
१४ दिवस कोणालाही भेटणार नाहीत मुरलीधरन
वी. मुरलीधरन यांच्या स्टाफने सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या संसर्गासंदर्भात चौकशी करण्यात आली असून हा अहवाल नकारात्मक आला आहे. यानंतरही मंत्र्यांनी १४ दिवस एकांतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते कोणालाही भेटणार नाही.