पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकेच्या २ प्रभागांची पोटनिवडणूक आज पार पडली. त्यात धानोरी-कळस विश्रांतवाडी या प्रभाग क्रमांक व फुरसुंगी लोहगाव प्रभाग क्र ४२ या दोन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. त्यात प्रभाग क्रमांक १ मधून भाजपच्या ऐश्वर्या जाधव यांनी विजय मिळवला. मात्र निकालानंतर ईव्हिएम मशीनवर वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.
या प्रभागात भाजपकडून ऐश्वर्या आशुतोष जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रेणूका हुलगेश चलवादी, वंचित बहुजन आघाडीच्या रोहिणी रामलिंग टेकाळे या तिघांनी लढविली. त्यात भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या जाधव यांनी ७१०६ मते मिळवून विजय मिळविला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार रेणुका हुलगेश चलवादी यांनी ४०८५ मते मिळाली. त्यासोबतच रोहिणी रामलिंग टेकाळे यांना २३४४ मते मिळाली.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्ते यांनी ईव्हिएम मशूनवर आक्षेप घेत विश्रांतवाडी बंद केली. त्यांतर मुकुंदराव आंबेडकर चौकात घोषणाबाजी केली. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.