चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – बामसेफ, मूलनिवासी संघ, मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ व मूलनिवासी विद्यार्थी संघ या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये भारतीय संविधान तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून त्यांच्यामध्ये संविधानाचा सम्मान, संवर्धन आणि सुरक्षा कशाप्रकारे करायची, याची माहिती देण्याच्या उद्देशाने भारतीय संविधान महाजनजागृती अभियान सुरू केले आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून बामसेफ आणि सर्व ॲपशुट विंग चंद्रपूरच्या वतीने २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुद्धीष्ठ समन्वय कृती समितीच्या पटांगणात संविधान जनजागृती महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता दिलीप वावरे यांचे हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्य के. के. शेंडे राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम. टी. साव, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. चक्रपाणी चोप्पावार आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मूलनिवासी बहुजन समाजातील बुद्धजिवी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक, विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बामसेफचे जिल्हा महासचिव पंकज जांगडेकर यांनी केले आहे.