नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यालयात प्रसारमाध्यम अधिकारी असलेले विनोद जैन यांनी आपल्या मुलाचे नाव ‘काँग्रेस’ ठेवले असून विनोद यांना त्यांच्या नवजात मुलाच्या जन्माचा दाखलाही मिळाला आहे. त्या जन्म दाखल्यावर त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘काँग्रेस जैन’ असे लिहिले आहे. तसेच विनोद जैन आणि त्यांचे कुटुंब बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसचे समर्थक आहेत. विनोद यांना येणारी पुढची पिढी आपल्या पावलांवर पाऊल टाकत चालेल, असे वाटते.
यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव काँग्रेस पक्षाच्या नावावरून ठेवले आहे. याबद्दल विनोद जैन म्हणाले की, ‘माझ्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवल्यामुळे माझ्या कुटुंबातील काही सदस्य नक्कीच नाराज झाले आहेत. पण आपल्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवण्यावर मी ठाम होतो. मला मुलगा झाला तर त्याचे नाव काँग्रेस ठेवणार हे अगोदरच सांगितले होते.
माझ्या मुलाचा जन्म जुलैमध्ये झाला असून त्याच्या जन्माचा दाखला मिळेपर्यंत खूप वेळ गेला. पण आता राज्य सरकारने त्याच्या जन्माचा दाखला दिला असून यात माझ्या मुलाचे नाव काँग्रेस जैन असे लिहिण्यात आले आहे.’
Visit : bahujannama.com