बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून सध्या राजकारणंही तापलं आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एम्सनं सीबीआयला अहवाल दिल्यानंतर आता काँग्रेसनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड काळं झालं आहे. भाजपच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
एम्स ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निर्वाळा दिला की त्याच्या शरीरात कोणतेही विष आढळले नाही. यातून भाजपाचे तोंड काळे झाले आहे. मुंबई व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी षडयंत्र करण्यामागे भाजपा आणि मोदी सरकारमधील मास्टरमाईंड सीबीआय ने चौकशी करून शोधावे. pic.twitter.com/rPvNQpb9qZ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 29, 2020
सचिनं सावंत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत म्हणतात, “एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड काळं झालं आहे. भाजपच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तेश्वर पांडे यांना उगाच नाही स्वेच्छानिवृत्ती दिली. मुंबई पोलिसांना ज्या वाईट पद्धतीनं बदनाम करण्यात आलं, महाराष्ट्राचा अपमान केला गेला ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपला कधीच माफ करणार नाही” असंही सावंत म्हणाले आहेत.
तिनों एजेंसियोंको राजनीतिक षड्यंत्र के तहत महाराष्ट्र में लाया गया। CRPC एवं संघराज्य प्रणालीकी धज्जियां उड़ाई गई। बिहार पुलिस का इस्तेमाल राजनीति के लिए किया गया। महाराष्ट्र सरकार और मुंबई पुलिस पर लांछन लगाए गए।
मोदी सरकार पुरस्कृत गोदी मिडिया ट्रायल की हम भर्त्सना करते हैं।— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 29, 2020
‘मोदी सरकारचं देशपातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं’
सचिन सावंत म्हणतात, “एम्सनं सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निर्वाळा दिला की, त्याच्या शरीरात कोणतंही विष आढळलं नाही. यातून भाजपचे तोंड काळे झाले आहे. मुंबई व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी षडयंत्र करण्यामागे भाजप आणि मोदी सरकारमधील मास्टरमाईंड सीबीआयनं चौकशी करून शोधावे.”
“मोदी सरकराचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं. राजकीय कटकारस्थान करून तीन तपास संस्थांना महाराष्ट्रात आणलं गेलं. संघराज्य चौकटीच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. राजकारणासाठी बिहार पोलिसांचा वापर केला गेला. मोदी सरकार पुरस्कृत मीडिया ट्रायलचा आम्ही निषेध करतो” असंही सावंत म्हणाले आहेत.