बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या बंडखोरीनंतर अपात्र ठरविण्यात आलेल्या 14 आमदारांपैकी एक एमटीबी नागराज पुन्हा चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांची महागडी कार आहे. त्यांनी 11 कोटी किंमतीची रोल्स रॉयस फँटम VIII नावाची कार खरेदी केली आहे. यावरील टॅक्स वगैरे अदा केल्यानंतर या लग्जरी कारची किंमत आणखी वाढू शकते.
कर्नाटक-जेडीएस सरकारच्या एकूण 17 आमदारांनी नाराज असल्याने जुलैमध्ये राजीनामा दिला होता. यानंतर राज्यात कार्यरत आघाडीचे सरकार कोसळले होते. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी कॉंग्रेसचे 14 आमदार अपात्र ठरवले होते. यात एमटीबी नागराज यांचाही समावेश होता.
He was already a millionaire – but now fresh from his holiday in Mumbai, for where he took off for by a personal flight (remember), recently disqualified @INCKarnataka MLA @MTBNagaraj (centre right of photo) poses with this new Rolls Royce Phantom. pic.twitter.com/UNJEipJtJJ
— Nivedith Alva (@nivedithalva) August 14, 2019
रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, त्यांनी अद्याप आपल्या कारवरील टॅक्स पे केलेला नाही. ज्यांच्याकडे अशी महाग कार आहे असे ते पहिलेच नेते नाहीत. कर्नाटकमधील जनार्दन रेड्डी, ज्यांना खाणीसाठी देखील ओळखले जाते, त्यांच्याकडेही अशीच कार आहे. एमटीबी नागराज हे एक श्रीमंत आमदार आहेत.
एमटीबी नागराज यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान आपली 1 हजार कोटींची संपत्ती जाहीर केली होती. त्यांनी आमदार पदाचा राजीनामाही दिला होता त्यावेळी त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न झाला होता.