Congress MP Rahul Gandhi | वादग्रस्त विधान करणं राहुल गांधीना पडलं महागात, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द (Disqualified) करण्यात आली आहे. लोकसभा (Lok Sabha) सचिवालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) केरळमधील वायनाड मतदारसंघातून (Wayanad Constituency) लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने (Surat Court) त्यांना गुरुवारी (दि.23) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी शुक्रवारी (दि.24) रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेतला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन अथवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.
Rahul Gandhi – Congress MP from Wayanad, Kerala – disqualified as a Member of Lok Sabha following his conviction in the criminal defamation case over his 'Modi surname' remark. pic.twitter.com/SQ1xzRZAot
— ANI (@ANI) March 24, 2023
काय आहे प्रकरण?
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरुन केलेल्या टिप्पणीवरुन सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार का? याबाबत चर्चा सुरु झाली होती. अखेर आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Congress MP Rahul Gandhi | congress leader rahul gandhi disqualified as mp of loksabha for modi defamation case
हे देखील वाचा :
Nilesh Rane | ‘…म्हणून वैभव नाईक शिवसेनेत’, निलेश राणेंचा गौप्यस्फोट (व्हिडिओ)
Comments are closed.