नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच तेथील नेत्यांनी प्रचाराला सुरुवात करून अनेक निवेदनांची मालिकाही सुरु केली आहे. त्यातच आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे. ‘केजरीवाल यांना जबाबदारीशिवाय सत्ता हवी आहे आणि किन्नर शतकानुशतके असे करत आले आहेत,’ असे थरूर यांनी म्हणत ‘किन्नर’ असा शब्दप्रयोग केजरीवाल यांच्यासाठी केला आहे. त्यांनतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाल्यामुळे त्यांनी युक्तिवाद करून माफी मागितली.
शशी थरूर यांना एका टीव्ही कार्यक्रमात अरविंद केजरिवला यांच्या नागरीकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचारले असता त्यांनी ‘केजरीवाल यांना सीएए समर्थक आणि विरोधक दोघांनाही आपल्याकडे वळवायचे आहे, असे ते म्हटले. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘आम आदमी पक्षाचे नेते दोन्ही बाजूंनी फायदे घ्यायचे बघत आहेत. केजरीवाल केंद्र सरकारच्या नागरिकत्व धोरणालाही विरोध करीत असून त्याविरोधात कोणतीही कठोर पाऊले उचलत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की, सोमवारी सोनिया यांनी सीएए विरोधात बैठक बोलावली होती. त्या बैठकीला आप उपस्थित नव्हती,’ असे म्हणाले.
थरूर म्हणाले की, ‘हिंसाचाराचा बळी गेलेल्यांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा असताना त्यांनी सामान्य मानवी सहानुभूती दाखविली नाही.’ नंतर ‘केजरीवाल यांना जबाबदारीशिवाय सत्ता हवी आहे, हे आपल्याला सर्वांना माहित आहे की शतकानुशतके किन्नरांचा विशेषाधिकार आहे. आणि अशा भूमिकेमुळे मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे स्थान सुरक्षित होईल. माझे म्हणणे आहे की, आपले पूर्ण राजकीय कारकीर्द हा प्रयत्न करत संपवू शकता की आपण शत्रू बनवू नये, परंतु शेवटी आपण कोणत्या गोष्टीसाठी उभे असतो?’