सूरत : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Congress Leader Rahul Gandhi) अडचणीत वाढ झाली आहे. मोदी आडनावाच्या (Modi Surname) मानहानीप्रकरणी राहुल गांधींना सूरत कोर्टाने झटका दिला आहे. मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात (Imprisonment) राहुल गांधींनी (Congress Leader Rahul Gandhi) केलेला अर्ज सूरत न्यायालयाने फेटाळला आहे. सूरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात (High Court) दाद मागणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुरतच्या सत्र न्यायालयात (Sessions Court of Surat) यापूर्वी हे प्रकरण 13 एप्रिल रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
Gujarat | Surat Court rejects the application filed by Congress leader Rahul Gandhi seeking stay on his conviction in the 2019 defamation case on 'Modi surname' remark. pic.twitter.com/BMVyXTkAs7
— ANI (@ANI) April 20, 2023
सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळे राहुल गांधी यांचं संसदेतील सदस्यत्वही रद्द झालं. खासदारकी रद्द (Canceled MP) झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सूरत कोर्टात आव्हान दिलं. मात्र, सूरत कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी 2019 च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरुन केलेल्या टिप्पणीवरुन सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार का? याबाबत चर्चा सुरु झाली होती. अखेर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Congress Leader Rahul Gandhi | rahul gandhi defamation case surat court rejects rahul plea modi surname
हे देखील वाचा :