बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत मिळून महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन होणार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यानंतर मंत्री आणि इतर पदांचा निर्णयही घेण्यात येईल. दरम्यान, या सर्वात कॉंग्रेसने मोठी मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. कॉंग्रेसने उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत असून कॉंग्रेस उपमुख्यमंत्री पदाऐवजी सभापतीपदाची मागणी करत आहे.
या अगोदर कॉंग्रेस नेहमीच उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय न घेण्याविषयी बोलत होते. कॉंग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदाविषयी सांगण्यासाठी दोन आगाऊ नावे सुचविली होती, पण कोणत्याही नेत्याने याची पुष्टी केली नाही. दरम्यान, अजितदाद पवार यांनी मी राष्ट्रवादीतच होतो आणि असणार आहे, हे मी यापूर्वीही बोललो आहे. मला कोणी पक्षातून काढून टाकले ? आपण हे कुठेतरी वाचले किंवा ऐकले आहे ? असे म्हणत मी अजूनही राष्ट्रवादीचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता त्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती मिळाली आहे, ज्यात देशभरातील ज्येष्ठ मान्यवर हजेरी लावतील.
visit : bahujannama.com