नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या आसनसोल येथील भाजपा कार्यकर्त्यांनी चीनचा निषेध करण्यासाठी रॅली आयोजित केली होती. पण, या रॅलीमध्ये त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचा पुतळा जाळला आहे. भाजपा कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये निषेध रॅलीबाबत माहिती देताना भाजपाचा कार्यकर्ता, आम्ही चीनचा विरोध करतोयलडाखमध्ये जे झाले त्याविरोधात आम्ही निषेध रॅली काढली आहेचीनचे जे पंतप्रधान आहेत किम जोंग त्यांचा आम्ही पुतळा जाळून निषेध करणार आहोत, असे म्हणताना दिसत आहे.
https://twitter.com/LavanyaBallal/status/1273568716110913537
लोकांनी चीनचे साहित्य न वापरता स्वदेशीचा अवलंब करावा, त्याद्वारे चीनला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करु, असेही आवाहन या कार्यकर्त्याने केले. शी जिनपिंगऐवजी किम जोंग उनचा पुतळा जाळणार असे म्हणणार्या या भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, निषेध करणार्या भाजपा कार्यकर्त्यांना कोणाचा पुतळा जाळायचा आहे याचीच माहिती नसल्याने यावरुन नेटकरी भाजपाला जोरदार ट्रोल करत आहेत.