Compulsory Helmet Rule In Pune | पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Compulsory Helmet Rule In Pune | Helmet compulsory for all government semi government PMC PCMC municipalities municipal councils all school college office workers in Pune city and district Collector Dr. Rajesh Deshmukh

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Compulsory Helmet Rule In Pune | रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू (Death) होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेट अभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू होण्याचा धोका सातपट जास्त आहे. रस्ते अपघातात 62 टक्के लोकांचा मृत्यू हा डोक्याला इजा झाल्यामुळे होत आहे.

त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी आज (गुरुवारी) एक आदेश जारी केला आहे (Compulsory Helmet Rule In Pune). त्यानुसार शासकीय (Government) आणि निमशासकीय (Semi-Government) अधिकारी/कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती (Helmet Forced) करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा डॉ. राजेश देशमुख ( Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिला आहे.

(Helmet compulsory for all government, semi-government, corporations, municipalities, municipal councils, all school-college office workers in Pune city and district – Collector Dr. Rajesh Deshmukh) मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) उच्च न्यायालय (High Court) व सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशानुसार देशात कुठेही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या तसेच पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात झाल्यास जीव वाचण्याचे प्रमाण 80 टक्क्यांनी वाढते. (Compulsory Helmet Rule In Pune)

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी आज काढलेल्या आदेशानुसार, पुणे जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालये, महामंडळे (Corporation), महापालिका (Municipal Corporation),
नगरपालिका, नगरपरिषद (Municipal Councils), सर्व शाळा (School), कॉलेज (College) व सर्व शासकीय यंत्रणा, यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या आणि दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात येताना – जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी दुचाकीचा वापर करताना हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. तसेच जे अधिकारी, कर्मचारी या नियमांचे पालन करणार नाही अशांवर कडक कारवाई (Strict Action) करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title :- Compulsory Helmet Rule In Pune | Helmet compulsory for all government semi government PMC PCMC municipalities municipal councils all school college office workers in Pune city and district Collector Dr. Rajesh Deshmukh

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Vitamin D Deficiency | कोणत्या लोकांमध्ये जास्त असते ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता? ही लक्षणे पाहून सहज ओळखा

Pune Crime | शारीरीक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ! विमाननगर परिसरातील रो हाऊस विकायला लावून महिलेचे केले आर्थिक शोषण; वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम

Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार