पुणे : बहुजननामा ऑनलाइन– पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून Compressed Biogas (CBG) इंधन निर्मितिचा प्रकल्प सुस रोड, बाणेर येथे उभारण्यात आलेला आहे. या Compressed Biogas (CBG) प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या CBG इंधनापासून पुणे शहरातील (Pune City) बसेस चालविण्याचे अभिनव उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आज (शुक्रवार) पुणे महानगरपालिका मुख्य इमारती समोरील बस स्थानक येथे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांच्या हस्ते पार पडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरातील बसेस चालविण्याचे अभिनव उपक्रम ‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ (City West to City Bus) पुणे महानगरपालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (Pune Metropolitan Transport Corporation Ltd.), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. (Indian Oil Corporation Ltd.), नोबेल एक्स्चेंज (Nobel Exchange) यांच्या संयुक्त संकल्पनेने राबविण्यात येत आहे.
सीएनजी (CNG) ऐवजी पुणे शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्माण झालेल्या सिबिजीचा (Compressed Biogas (CBG) हा एक पर्यावरणपूरक दीर्घकालीन शाश्वत उपाय आणि इतर शहरांसाठी अनुकरण करण्यासाठी एक आदर्श ठरेल. तळेगावजवळील सोमाटणे येथे असलेल्या इंडियन ऑईल रिटेल आउटलेट मध्ये पीएमपीएमएलच्या (PMPML) बसेसला इंधन दिले जाईल. आजपासून दैनंदिन सुमारे 10-15 बसेसमध्ये कचऱ्यापासून निर्माण होणारे CBG इंधन भरण्यासाठी व्यावसायिक ऑपरेशन्स सुरु झाले आहे आणि टप्प्याटप्प्याने दैनंदिन सुमारे 100 सिटी बसेसपर्यंत सदरचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याकरिता सध्यस्थितीत पुणे शहरामध्ये निर्माण होणारे सुमारे 125 मे. टन ओला कचरा सदर प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात येत असून सदर प्रकल्पाची 200 मे. टन प्रती दिन क्षमता वाढ करण्याचे नियोजन आहे.
या कार्यक्रम अतिरिक्त महापालिका (ज) रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade),
अतिरिक्त महापालिका (ई) डॉ. कुणाल खेमनार (Dr. Kunal Khemnar),
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चे मा. व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार मिश्रा (Lalit Kumar Mishra),
उप आयुक्त आशा राऊत Asha Raut (घनकचरा व्यवस्थापन विभाग)
आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर रवींद्र के आर (Ravindra K. R.)
व मे. नोबल एक्स्चेंज कडील अधिकारी नुरीअल पेझरकर (Nuriel Pazerkar) यांच्या उपस्थितीत पार पडला.
Web Title :- Compressed Biogas (CBG) | Inauguration of buses in Pune city from compressed biogas fuel
हे देखील वाचा :