नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत भाजपाला कमी जागा मिळाल्या असूनही भाजपच्या उपाध्यक्ष उमा भारती यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत नवीन वाद निर्माण केला आहे. त्यांनी मोदींशिवाय भाजपमध्ये कोणताही सक्षम नेता नसून सर्व लोकांना मोदी हवे आहेत, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींना छत्रपती मोदी जिंदाबाद असे म्हटल्याने नवीनच वाद निर्माण होऊ शकतो.
मागच्याच महिन्यात नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे पुस्तक लिहिल्याने वाद झाला होता. आणि आता उमा भरती यांनीही मोदींचा उल्लेख छत्रपती मोदी असा केल्याने नव्या वादाला तोंड फुटू शकते. त्यांनी दिल्लीतील निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केले आहे. त्यात जवळपास दीड वर्षांपासून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक, त्यानंतर लोकसभा निकाल, अलीकडेच काही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले त्यातून हे स्पष्ट होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता नाही. संपूर्ण देशाने मोदींना आत्मसात केलं आहे. तसेच छत्रपती मोदी जिंदाबाद असं कौतुक करण्यात आले आहे.
2. लगभग डेढ़ वर्ष में हुए विभिन्न राज्यों में विधानसभाओं के चुनाव, फिर उसके बाद हुआ लोकसभा का चुनाव, फिर अभी हाल के कुछ महीनों में हुए राज्यों में विधानसभाओं के चुनाव के परिणाम साफ बता रहे हैं कि भाजपा में, भारत में प्रधानमंत्री @narendramodi के समकक्ष कोई नेता नहीं।
— Uma Bharti (@umasribharti) February 11, 2020
त्यांच्या या ट्विटवर काहींनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ही पदवी मोदींना शोभून दिसते का?, असा प्रश्न केला आहे. तसेच छत्रपती शिवरायांना जितके कार्य केले त्याच्या कणभरही काम करून दाखवा, असा सल्लाही दिला आहे.