बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 1456 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात कोरोनाचे 1100 नवे पॉझिटिव्ह समोर आले असून त्यामध्ये पुर्वीच्या 233 जणांचा समावेश आहे. दिवसभरात पुणे शहरातील 39 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 21 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू होणार्यांची संख्या आता 2832 पर्यंत पोहचली आहे.
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 757 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 532 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 393 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 928 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 470 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.