Comedian Raju Srivastava Passed Away | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

  Comedian Raju Srivastava Passed Away |comedian raju srivastava passed-away at 58 in aiims hospital

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचं एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) निधन (Comedian Raju Srivastava Passed Away) झालं. ते  58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. त्यांच्यावर गेल्या 41 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ते व्हेंटिलेटरवर (Ventilator) होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती. परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून  आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत (Comedian Raju Srivastava Passed Away) मालवली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड (Brain Dead) म्हणून घोषित केले होते. आज त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्यानं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.

 

 

राजू श्रीवास्तव हे 10 ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता.
त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.
राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी (Angiography) करण्यात आली होती. पण त्यांची प्रकृती खालावली. या दरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आले. पण 18 ऑगस्टला दुपारच्या सुमारास त्यांच्या मेंदूनही काम करणं बंद केलं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज (बुधवार) जगाचा (Comedian Raju Srivastava Passed Away)  निरोप घेतला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Comedian Raju Srivastava Passed Away |comedian raju srivastava passed-away at 58 in aiims hospital

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | ‘ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है’; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंसह विरोधकांवर साधला निशाणा

M.R.Poovamma | आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या ‘या’ भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

Pune Crime | पुणे स्टेशनला जाण्यास नकार देणार्‍या कॅबचालकावर चाकू हल्ला करणार्‍याने पोलिसांना केले जखमी