नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोचीन शिपयार्ड लिमिटेडने ट्रेड अप्रेंटीस अँड टेक्निशियन (व्होकेशनल) अॅप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. या पदांवर भरतीसाठी एकूण 358 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ट्रेड अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर तंत्रज्ञ (व्यावसायिक) शिक्षु पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण केले असावे. ट्रेंड अॅप्रेंटिसॅप्रेंटिससाठी 350 तर टेक्निशियन अॅप्रेंटिसॅप्रेंटिससाठी 8 पदांवर भरती काढण्यात आली आहे.
वरील पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार cochinshipyard.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ट्रेड अॅप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 8,000 रुपये, तर टेक्निशियन अॅप्रेंटिसॅप्रेंटिस पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9,000 रुपये दिले जातील. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा नियमांनुसार निश्चित केली जाईल. जाहीर केलेल्या सर्व पदांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 15 जुलै 2020.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 04 ऑगस्ट 2020
निवड प्रक्रिया :
सर्वप्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी केली जाईल. त्यानंतर संबंधित शैक्षणिक पात्रतेसाठी प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्या उमेदवारांची निवड केली जाईल.
ट्रेड अप्रेंटिसच्या विविध ट्रेंडनुसार रिक्त जागा-
1. इलेक्ट्रीशियन – 47
2. फिटर – 36
3. वेल्डर – 47
4. मशीनर – 10
5. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 15
6. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 14
7. ड्रॉट्समन (मेकॅनिक) – 06
8. ड्रॉट्समन (सिव्हिल) – 04
9. पेंटर (जनरल) – 10
10. मेकॅनिक मोटर व्हेहीकल- 10
11. शीट मेटल वर्कर – 47
12. शिपराइट वुड (सुतार) – 20
13. मेकॅनिक डीझेल – 37
14. फिटर पाईप (प्लंबर) – 37
15. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक – 10
एकूण रिक्त जागा – 350
टेक्निशियन (वोकेशनल) अप्रेंटिसेसच्या विविध ट्रेंडनुसार रिक्त पदे –
1. अकाऊंटींग अँड टॅक्सेशन – 01
2.कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट – 02
3. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी – 01
4. फूड अँड रेस्टॉरंट मॅनेजमेंट – 03
5. बेसिक नर्सिंग ॲड पँलिएटिव केयर – 01
एकूण रिक्त जागा : 08