CNG Price Hike | सीएनजीच्या दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग
गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीची मागणी वाढत आहे. स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) सीएनजीवरील करात कपात केल्याने १ एप्रिल २०२२ रोजी सीएनजीचे दर कमी होऊन ते ६२.२० रुपये किलो झाले होते. त्यानंतर गेल्या ४ महिन्यात ७ वेळा वाढ करण्यात आली आहे. त्यात तब्बल २८.८० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पर्यावरण पुरक आणि स्वस्त यामुळे अनेकांनी आपली वाहने सीएनजीमध्ये परार्वतित करुन घेतली.
शहरातील सर्व रिक्षा या सीएनजीवर चालतात. या सततच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
त्यामुळे आता रिक्षा पंचायतीने या दरवाढीविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
९ ऑगस्ट रोजी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
Web Title :- CNG Price Hike | CNG price hike: Rs 6 per kg, 29 rupees more expensive in 4 months
हे देखील वाचा :
Comments are closed.