मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत (CNG Price Hike) मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas Limited) या इंधन पुरवठादार कंपनीने मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत (CNG Price Hike) प्रति किलो 2.58 रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रति युनिट 0.55 पैसे वाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीमुळे मुंबईतील लाखो रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या कारणामुळे दरवाढ
गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्याने परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे नियोजन करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येणार आहे, असे महानगर गॅस लिमिटेडने (MGL) स्पष्ट केले आहे. यानुसार आज मध्यरात्रीपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) मध्ये 2.58 प्रति किलो आणि पीएनजी (PNG) गॅसच्या किमतीत 0.55 पैसे प्रति युनिटने वाढ केली जाणार आहे. हे दर बुधवारी (दि.14) सकाळपासून लागू होतील.
नव्या दरवाढीनंतर सुधारित किंमती
नव्या दरवाढीनुसार मुंबई आणि आसपासच्या सीएनजी, घरगुती पीएनजीच्या सुधारीत किंमती या 51.98 प्रति किलोग्रॅम आणि 30.40/एससीएम (स्लॅब) आणि 36.00/एससीएम (स्लॅब 2) अशा होणार आहेत. अंतरानुसार यामध्ये कमी जास्त फरक असणार आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत पीएनजीचे दर 35 टक्क्यांनी कमी असणार आहेत.
Web Titel :- cng price hike big increase price cng domestic pipeline gas midnight
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coffee | कॉफी प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका कमी होतो का? रिसर्चमध्ये मिळाले उत्तर
Rajasthan News | धक्कादायक ! सेल्फी काढताना अचानक वीज कोसळल्याने 11 जण जागीच ठार