बहुजननामा ऑनलाईन टीम : बेरोजगारी हा देशातील महत्वाचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत १० राज्यांच्या बेरोजगारीचा अहवाल समोर आला आहे, परंतु विशेष बाब म्हणजे या १० राज्यांपैकी ६ राज्यांत भाजप सरकार असून त्यानंतर राज्यांत प्रादेशिक पक्षांसोबत युती सरकार आहे. अलीकडेच, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने बेरोजगारीशी संबंधित आकडेवारी सादर केली. सीएमआयईने सप्टेंबरमध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार, त्रिपुरामध्ये सर्वाधिक बेरोजगारी आहे.
केलेल्या सर्वेक्षणानुसार हरियाणा, हिमाचल, झारखंड बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या भाजपा शासित राज्यांमध्ये सर्वाधिक बेरोजगारी आहे. आकडेवारीनुसार, भाजपा शासित राज्यांमध्ये बेरोजगारी ३१.२ टक्के आहे. दिल्लीत २०.०, हरियाणामध्ये २०.३ टक्के बेरोजगारी आहे. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी १५.६ टक्के, पंजाब ११.१ टक्के, झारखंड १०.९ टक्के, बिहार १०.३ टक्के, छत्तीसगडमध्ये ८.६ टक्के, तर यूपीमध्ये ८.२ टक्के बेरोजगारी आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर भारतामध्ये राज्यांपेक्षा बेरोजगारी कमी आहे.
कर्नाटकमध्ये ३.३ तामिळनाडूमध्ये १.८ टक्के बेरोजगारीचा दर आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे आणि निवडणुका लवकरच सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर ५ .७ टक्के आहे.भारतामध्ये ग्रामीण भागात बेरोजगारी गेल्या सहा वर्षात साडेतीन पटीने वाढली आहे.
Visit : bahujannama.com