नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मेहुणी अमृता श्रृंगारपुर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात श्रृंगारपुरे यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांवर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमृता श्रृंगारपुरे या शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतत होत्या. त्यांची कार पांगरी गावाजवळ आली असताना कार एका छोट्या पुलावरून खाली कोसल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच सिन्नर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना तातडीने नाशिकमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.