कल्याण :बहुजननामा ऑनलाईन – CM Uddhav Thackeray | कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्य सरकारने राज्यात संपुर्ण लाॅकडाऊन जाहीर केलं. यावेळी सर्व मंदिरे (Temples) उघडण्यावरही बंधणे आणली गेली. दरम्यान तेव्हापासुन मंदिर सुरु करण्यास मुभा देण्यात आले नाही. यावरुन भाजपने आंदोलने देखील केली. दरम्यान, मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मोठं विधान केलं आहे. (temples Will Be Opened In Phases)
आज जरी मंदिरे बंद असली तरी देखील आपण सध्या अत्यावश्यक आरोग्य मंदिरे (Temples) उघडत आहोत. त्याबद्दल जनता नक्कीच आशीर्वाद देईल, असं म्हणत.
राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडली जातील, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan-Dombivali Municipal Corporation) विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Union Minister Kapil Patil) यांच्याशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, राज्यात आज मंदिरे बंद आहेत. मात्र ही मंदिरे जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरे मात्र हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडत आहोत. त्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद देईल.
राज्यातील धार्मिक स्थळे उघडली गेली पाहिजेत हे ठिक आहे.
त्यापेक्षा तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे, आज त्याचीच आवश्यकता आहे.
असे कपिल पाटील यांना उद्देशून म्हणताना, की आरोग्य केंद्र बंद करून त्याच्याबाजूचे मंदिर उघडू? असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी कपिल पाटील यांना केला.
आरोग्य केंद्र महत्त्वाचे असल्याचे सांगत आपण मंदिरेही उघडणार आहोत.
पण एका टप्प्याटप्प्याने आपण जात आहोत, असं पुढे ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढं उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की, आपण घोषणा देतो.
भारत माता की जय असे म्हणतो. घोषणा दिल्याच पाहिजेत.
आम्ही देखील घोषणा दिलेल्या आहेत. आम्ही त्याच्याही जाऊन हिंदूत्वाचे रक्षण केले.
सन 1992-93 मध्ये शिवसेनेने ते दाखवूनच दिले आहे. मात्र भारत माता की जय’ बोलल्यानंतर भारत मातेची मुले जर आपल्या आरोग्यासाठी तळमळत असतील तर ती भारत माता आपल्याला काय सांगेल?अरे माझा जयघोष काय करता? माझ्या बाळांकडे पाहा, त्यांना औषधे आणि सोयी सुविधा द्या,असेच भारत माता सांगेल. केवळ घोषणा दिल्याने ही मुले बरी होणार नाहीत.या मुलांना कसे बरे करता येईल ते पाहा असेही भारत माता म्हणेल. हे लक्षात घेता त्या दिशेने आपण पाऊल टाकत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Web Title : CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray has made an important statement that temples in the state will be opened in phases.
Sharad Pawar | सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली’; शरद पवारांचा टोला
Uday Samant | राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासुन सुरु होणार – उदय सामंत यांची घोषणा
Maharashtra Lockdown | …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन निश्चित?; सध्या दैनंदिन बाधितांची संख्या 4 ते 5 हजार