ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब (Balasaheb Thackeray) यांचा सेवक चंपासिंग थापा (Champasing Thapa) याने सोमवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे गटात (Shinde Group) जाहीर प्रवेश केला. आयुष्यभर मातोश्रीवर राहून बाळासाहेबांची सेवा करणारा थापा शिंदे गटात गेल्याने अपेक्षेप्रमाणे शिवसेनेतून (Shivsena) तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आली. शिवसेनेने म्हटले की, मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा माणूस पैसे घेऊन शिंदे गटात गेला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले की, ते कोणाला नोकर समजले त्याच्यामुळे त्यांची ही परिस्थिती झाली आहे. तसेच थापा हे मध्यंतरी आपणास येऊन भेटले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नाराजी ही व्यक्त केली होती.
शिंदे पुढे म्हणाले, हा माणूस पैशाने विकला जाणारा नसून तो निष्ठावंत माणूस आहे.
तो बाळासाहेबांसोबत अनेक वर्ष होता. बाळासाहेब आणि थापा हे समीकरण अख्ख्या देशाने पाहिले आहे.
त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हा खर्या अर्थाने नेपाळी माणूस आणि समाजाचा अपमान आहे.
त्याचा मी जाहीर निषेध करतो.
Web Title :- CM Eknath Shinde | thapa is not a man who sells money he is loyaleknath shindes reply to the thackeray group
हे देखील वाचा :
Raw Food Side Effects | ‘हे’ 5 हेल्दी फूड्स चुकूनही कच्चे खाऊ नका, होऊ शकते गंभीर नुकसान!
Pear Health Benefits | डाएटमध्ये सहभागी केले नाशपती तर चांगल्या आरोग्यासह मिळेल तजेलदार त्वचा!