मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पहिला दसरा मेळावा (Dasara Melava 2022) बीकेसी ग्राऊंडवर (BKC Ground) पार पडला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जवळपास दीड तास भाषण केले. मात्र हे भाषण अपेक्षेप्रमाणे रंगले नाही, अशी टीका विरोधक आणि नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे (NCP Spokesperson Ravikant Varpe) यांनी देखील एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. टेलीप्रॉम्प्टर (Teleprompter) इतका महाग आहे का? 50 खोक्यात पण घेता नाही आला… भाषण देताना सतत खाली मान घालून कागदावर लिहलेले वाचण्याचे कष्ट नसते झाले. थोडी तरी इज्जत वाचली असती, असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.
टेलिप्रॉम्प्टर इतका महाग आहे का ? ५० खोक्यात पण घेता नाही आला..
भाषण देताना सतत खाली मान घालून कागदावर लिहलेले वाचाण्याचे कष्ट नसते झाले. थोडी तरी ईज्जत वाचली असती. @mieknathshinde— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) October 5, 2022
शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटांच्या (Thackeray Group) दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती.
पोलिसांच्या (Mumbai Police) अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे 1 लाख 25 हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती.
तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात 65 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | ncp spokesperson ravikant varpe has also criticized cm eknath shinde
हे देखील वाचा :