ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्याची (Ayodhya Tour) जय्यत तयारी सुरु झाली आहे. अयोध्येला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशनवर (Thane Railway Station) शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. 9 एप्रिलला मुख्यमंत्री शिवसेना आमदार (Shivsena MLA), खासदार (MP) तसेच मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्येत प्रभू श्रीरामाचं (Lord Sri Rama) दर्शन घेणार आहेत. यासाठी शिवसैनिक आजपासूनच अयोध्येला रेल्वेने रवाना होत आहेत. रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) म्हणाले होते की, राम हे दैवत असून मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लाचे दर्शन घेत आहेत हे चांगलं आहे. यावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं, तुमच्या अयोध्या दौऱ्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे, असं तुम्हाला वाटतं का? यावर बोलताना त्यांनी विरोधक आणि प्रामुख्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाव न घेता टोला लगावला.
एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या दौऱ्याची त्यांनी धास्ती घेतलीय की नाही हे मी म्हणणार नाही. पण मी सर्वांना कामाला लावलंय ही वस्तूस्थिती आहे. जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी अनेकवेळा उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत, मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका केली होती.
ठाणे येथे पत्रकारांशी संवाद https://t.co/2kNDot4yvY
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 7, 2023
दौऱ्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा, यासाठी भाजप (BJP) मैदानात उतरली आहे.
भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan)
यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तसेच उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार त्यांच्या सोबत असणार आहेत. अयोध्येमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजपने शिंदेंना बळ देणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde slams uddhav thackeray ayodhya rally
हे देखील वाचा :