औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हे वक्तव्य केलं. राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात गुवाहाटीचा उल्लेख करत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिंते यांनी आमची बदनामी केली होती असेही म्हटले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी औरंगाबादमध्ये रविवारी रात्री प्रसारमाध्यमांशी राऊतांविरोधात ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी त्याबद्दल चौकशी सुरु आहे. चौकशी अंती माहिती समोर येईल, असं शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारताना, ते बऱ्याच जणांना तुरुंगात टाकण्यासाठी निघाले होते. तुम्ही गुवाहाटीला असताना… असं म्हणत असताना शिंदे यांनी प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच सांगितले की, त्यांनी आम्हाला पण तुरुंगात घालण्याचा विचार केला होता. आमची देखील बदनामी केली.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ठीक आहे, आम्ही ते विसरुन गेलो. या सर्वांना मी आगोदरच सांगितलं
की समोरच्याने खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्याने आम्ही तसं करणार नाही.
आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ असंही शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान ईडीच्या अथवा दडपणामुळे आमच्याकडे व भाजपकडे येण्याचे ‘पुण्यकाम करु नका’,
असा सल्ला देत मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊत यांना ‘कर नाही तर डर कशाला’ असा तिरकस टोला लगावला.
Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde reacts on arrest of sanjay raut by ed says he tried arresting us also
हे देखील वाचा :
Shivsena MP Sanjay Raut Arrest | संसदेचे अधिवेशन सुरु असताना अटक झालेले संजय राऊत पहिलेच खासदार
Sanjay Raut | संजय राऊतांकडे CM एकनाथ शिंदे यांचे 10 लाख रुपये ?, दीपक केसरकर म्हणाले…