मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शुक्रवारी (दि.22) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारले असता त्यांनी दिल्ली दौऱ्याचे कारण सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) मोठ्या बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्नेहभोजन ठेवलं होतं. त्यासाठीच आम्ही दिल्लीला गेलो होतो, अशी माहिती शिंदे यांनी दिली. ते आज (शनिवार) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला गेलो होतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोठ्या बहुमताने विजयी झाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेहभोजन ठेवलं होतं. त्यासाठी देशातील सर्वच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्या स्नेहभोजनासाठी आणि राष्ट्रपतींचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही दिल्लीत गेलो होतो.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्यासह सर्वच लोक होते. तो स्नेहभजनाचा कार्यक्रम असल्याने येथे बैठक, चर्चा झाली नाही. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल त्याबाबत शंका बाळगण्याचं कारण नाही, असेही शिंदे म्हणाले.
कामांना स्थगिती देण्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) कामाला स्थगिती दिलेली नाही.
आम्ही राज्यपालांना (Governor) पत्र दिल्यानंतर अल्पमतात असणाऱ्या सरकारने घाईगडबडीत 400 जीआर काढले.
त्याला आम्ही स्थगिती दिली आहे. विकास कामांना राज्य सरकार कोणतीही स्थगिती देणार नाही.
घाईत घेतलेल्या निर्णयांना स्थगिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगितीचा कोणताही विषय येत नाही.
ते आमचं आराध्य दैवत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde on question of cabinet expansion in maharashtra after delhi visit
हे देखील वाचा :
Pune Rural | पुणे जिल्ह्यात (ग्रामीण) 5 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू