मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुलाखतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि भाजपवर (BJP) टीका करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही तर माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यासही नकार दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.
शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना आपली ताकद दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde birthday wishes to shivsena chief uddhav thackeray
हे देखील वाचा :
MNS | ‘अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेने राज ठाकरेंना दगा दिला’ – संदीप देशपांडे