CM Eknath Shinde | बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra-Karnataka Border Dispute | maharashtra assembly winter session 2022 maharashtra karnataka border dispute resolution was presented in vidhansabha

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन CM Eknath Shinde | तुमचे लोक असताना आमचे लोक होते का ? आमचे लोक घोषणा देत असताना तुमचे लोक पुढे गेले. मिटकरी (Amol Mitkari) आला आणि कळ काढायला लागला. रोज गद्दार गद्दार, आम्ही बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच (NCP) आपला शत्रू, त्यांना जवळ करण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन. भाजप (BJP) – शिवसेना युती म्हणून निवडणूक लढवली. बहुमत मिळालं त्यानंतर अनैसर्गिक आघाडी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली ? असा सवाल एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांना केला.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले, सिल्लोडच्या सभेत लोकांची दुतर्फा गर्दी झाली होती. सगळीकडे लोक बाहेर पडले होते. आम्ही गद्दार असतो तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. आम्ही घेतलेली भूमिका त्यांना पटली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्यांच्याशी आम्ही फारकत घेतली. आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची आवश्यकता नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय

माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री केला. राज्याचा कुणीही मुख्यमंत्री असू द्या. नारायण राणेंनी (Narayan Rane) मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले तेव्हा केंद्रीय मंत्री असताना त्यांना जेलमध्ये टाकले. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथं बसलोय. बहुमत सिद्ध करुन बसलोय. जे अध्यक्ष आहेत त्यांना घटनेचा अभ्यास आहे. वैचारिक पातळी घसरली आहे. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय. गोरगरिब जनतेचे अश्रू दूर करण्याचं कंत्राट घेतलंय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे कंत्राट घेतलंय. असंगाशी विसंगती करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा असा टोला त्यांनी उद्धव ठाकेर यांना लगावला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde attacks shivsena chief uddhav thackeray in vidhan sabha

 

हे देखील वाचा :

Maharashtra Sugar Factory | राज्यातील 81 साखर कारखान्यांची 39 कोटींची फसवणूक ! उसतोड टोळ्यांकडून करार न पाळल्याचा परिणाम

Pune Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, दीपक केसरकर यांची माहिती

Pune Crime | जुन्या भांडणावरुन महिलेचा खून, पुणे जिल्ह्यातील कळसमधील घटना