नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी समाजासाठी मोठं काम केलं आहे. त्यांच्यावर सगळ्या समाजातील लोकांचं प्रेम होतं. पंकजाताईंनी समस्या मांडली. मी शब्द देतो, मुंडे साहेबांच्या नावाने असलेली ऊसतोड कामगारांच्या (Sugarcane Workers) मुलांच्या वसतीगृहासाठीचे काम युद्धपातळीवर सुरु होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत या घोषणेवर आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ मुंडे त्यांच्या नावाने हॉस्पिटलही उभारले जातील आणि स्मारक सुद्धा होईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नाशिकमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), पालकमंत्री दादाजी भुसे (Guardian Minister Dadaji Bhuse), राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil), पंकजा मुंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता आज आपल्या घरातील शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवते, असे लोकनेते या राज्यात आपण पाहिले आहेत.
अनेक लोकनेते ज्यांनी चांगले काम केले. ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले.
पण गोपीनाथ मुंडे हे लोकनेता या बिरुदाचे मुकुटमणी होते.
त्यांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला.
आता, तर गाड्या घोड्या सर्व आलं पण 70 च्या दशकात त्यांनी सायकलवरुन या राज्यात पक्ष वाढवण्याचे
काम केले, असे म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.
गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांनी शिवसेना भाजप युतीसाठी
(Shiv Sena BJP Alliance) पुढाकार घेतला. शिवसेना भाजप युतीचे मुंडेसाहेबच शिल्पकार होते.
बाळासाहेबांवरही त्यांचे प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती, आणि बाळासाहेबांनाही त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते विश्वास होता.
त्याचे साक्षिदार आम्ही आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जे नुकसान होईल, ते भरुन देऊ
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. पण शेतकऱ्यांनो घाबरू नका,
अवकाळी पावसामुळे जेवढे नुकसान होईल, तेवढे आम्ही भरुन देऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वत्र अवकाळी पाऊस पडत आहे. पण शेतकरी बांधवांनो काळजी करु नका, आम्ही सोबत आहोत,
हे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे शिंदे म्हणाले.
Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde announced hospital and memorial will be built in the name of gopinath munde
हे देखील वाचा :
Bhagini Nivedita Bank | भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा 22 मार्च रोजी सुवर्णमहोत्सवी वर्ष प्रारंभ
T20 World Cup | अमेरिकेला मोठा झटका ! ICC ने T20 वर्ल्ड कप 2024च्या बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय