मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) १२ खासदार शिंदे गटात गेले. त्यात, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आणि कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिंदे गटातील (Shinde Group) खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कीर्तिकरांचे स्वागत केले. गजानन कीर्तिकर आल्यामुळे त्यांच्यावरचा संघटनात्मक भार कमी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिंदे पुढे म्हणाले, ‘मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे. संघटनात्म बांधणी कशी बांधायची ती गजानन किर्तीकर यांना माहिती आहे. शिवसेनेच्या वाढीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते आपल्याबरोबर आलेत याचा मला आनंद आहे. त्यांच्या कौशल्यामुळे संघटना बांधणीला मदत होणार आहे. कीर्तिकरांवर आमच्याकडे येण्यासाठी कोणतीही अट नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackarey) यांची संघटना बलवान करण्यासाठी मला तुमच्याकडे यायचे आहे, एवढंच ते मला म्हणाले.’
‘मी आज स्वत:ला नशीबवान समजतो, मी केलेल्या उठावाची दखल जगाने घेतली.
गजानन किर्तीकर आपल्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे.
मुंबई कालही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आजही बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि उद्याही
बाळासाहेबांची राहणार.’ असे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहे.
गजानन कीर्तिकर जरी शिंदे गटात आले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अजूनही उद्धव ठाकरे गटात आहे.
Web Title :- CM Eknath Shinde | big responsibility on the shoulders of gajanan kirtikar-cm eknath shinde
हे देखील वाचा :
Shah Rukh Khan | शाहरुखची दीपिकासाठी खास पोस्ट ; म्हणाला “मी तुला पाहतोय……. पाहतोय…… “