CM Devendra Fadnavis | ‘कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा’; CM देवेंद्र फडणवीस यांचा भाजप आमदारांना सल्ला

मुंबई : CM Devendra Fadnavis | ”आपल्या पक्षाने जे संस्कार दिले आहेत, ते घेऊनच पुढे जा. सरकारी कंत्राटं मिळविण्याच्या मागे लागू नका,” असा सल्लाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिला आहे. आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा. विकासाची कामे करताना आपल्या मतदारसंघाचे कशात भले आहे, त्याचा विचार करूनच कामे करा, असे फडणवीस यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते.
मुंबईत गुरुवारी भाजप आमदारांची बैठक पार पडली. या वेळी फडणवीस बोलत होते. या वेळी फडणवीस यांनी फेक नरेटिव्हरच्या मुद्द्यावरुनही भाजप आमदारांना मार्गदर्शन केले. विरोधकांनी फेक नरेटिव्ह तयार करायच्या आधीच सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने नरेटिव्ह तयार करा, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर नुकताच स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला होता. या मेजवानीसाठी महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळीही फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यांना वादग्रस्त विधाने टाळण्याचा सल्ला दिला होता.