बहुजननामा ऑनलाईन : एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनं बाथरूममध्ये रॉकेल टाकत स्वतःला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात ही घटना घडली आहे. दरम्यान मुलगी स्वतःला बाथरूममध्ये पेटवून घेत असताना शौचालयाच्या दाराबाहेर उभा असलेला तिचा भाऊ जोरजोरात ओरडू लागला. यानंतर, शिक्षकांनी दरवाजा तोडला आणि विद्यार्थिनीला बाहेर काढले, जिथे बेशुद्ध अवस्थेत मुलगी खाली फरशीवर पडली. घाईघाईत तिला शालेय वाहनातून सीएससी औराई येथे नेण्यात आले, तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितले.
औराई कोतवाली परिसरातील एका गावातील विद्यार्थिनी सेंट जॉन स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत असून तिचा भाऊ पहिलीच्या वर्गात शिकत आहे. दोघेही सकाळी ७ वाजता औरई कोतवालीपासून १०० मीटर अंतरावर वेस्ट सेंट जॉन स्कूलमध्ये दाखल झाले. यानंतर, मुलगी थेट तिच्या वर्ग खोलीत न जात बाथरूममध्ये गेली. तिने आत जाऊन शौचालयाचा दरवाजा बंद केला. सोबत त्याचा भाऊही शौचालयाच्या दाराबाहेर आपल्या बहिणीची वाट पाहत उभा होता. थोड्या वेळाने शौचालयाच्या आतून धूर येऊ लागला.
यावर तिच्या भावाने मोठ्याने ओरडायला सुरवात केली की मेरीने स्वतःला पेटवून घेतल आहे. त्याचा आवाज ऐकून तेथील शिक्षक शौचालयाच्या दिशेने धावले, परंतु शौचालयाचा दरवाजा आतून बंद होता. शिक्षक व कर्मचार्यांनी शौचालयाचा दरवाजा उघडून विद्यार्थिनीला बाहेर काढले. ती बेशुद्ध पडली होती. विद्यार्थिनीचा चेहरा, मान आणि शरीराचे अवयव वाईट रीतीने जळून गेले होते. घाईघाईने, शिक्षकाने तिला तिच्या शाळेच्या कारमधून सीएचसी औरकडे नेले, जिथे डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. उपचारादम्यान मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना वाराणसी ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर सिरिअल पाहिल्यानंतर तिने असे पाऊल उचलले असावे असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.